'लॉ' फिल्म लवकरच प्रदर्शित होणार

Foto
अमेझॉन प्राईम व्हिडिओवर लवकरच कन्नड फिल्म 'लॉ' प्रदर्शित करण्यात येणार आहे. ज्याचा प्रीमियर १७ जुलै ला होईल. चित्रपट एक मनोरंजक क्राइम-थ्रिलर आहे, जो न्यायासाठी उभ्या राहणाऱ्या नंदिनीच्या आसपास फिरते. या आगामी चित्रपटाच्या संहितेने मला आकर्षित केले, त्यामुळे मी या चित्रपटाला होकार दिला असल्याचे अमेझॉन प्राईम व्हिडिओवर झळकणाऱ्या 'लॉ' फिल्मला रागिनी चंद्रनने होकार दिला होता असे स्पष्ट केले. 

रागिनी 'लॉ' चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण करते आहे. या अनुभवांविषयी बोलताना अभिनेत्री रागिनी म्हणाली की, "याचे श्रेय निश्चितच चित्रपटाच्या संहितेला जाते कारण चित्रपटसृष्टीत येण्याचे मी ठरवले नव्हते. मात्र चित्रपटाच्या संहितेने मला आकर्षित केले, खासकरून जेव्हा आमचे दिग्दर्शक श्री रघु समर्थ यांनी मला संहिता ऐकवली." अभिनेत्रीने पुढे म्हटले की, "त्यांनी मला व्यक्तिरेखेची पार्श्वभूमी आणि त्याच्या चारी बाजूंना फिरणाऱ्या संपूर्ण कथेविषयी सांगितले, जो एक खूपच मजबूत आणि प्रभावशाली प्लॉट होता. मला माझ्या डेब्यूसाठी एका रोमांटिक चित्रपटाचा भाग बनायचे नव्हते. यासाठी मी विचार केला की माझ्या डेब्यूसाठी याहून दुसरी फिल्म नसेल." तसेच चित्रपट ‘लॉ’ ची निर्मिती अश्विनी पुनीत राजकुमार आणि एम गोविंदा यांनी केली असून रघु समर्थ यांचे दिग्दर्शन केले आहे. या कायदेविषयक कन्नड ड्राम्याचे नेतृत्व रागिनी प्रजवाल हिने केले असून मुख्य अभिनेत्रीच्या रुपात ती आपला डेब्यू करत आहे. चित्रपटात दिग्गज अभिनेता मुख्मंत्री चंद्रू, सिरी प्रल्हाद, अच्युत कुमार, सुधरानी यांसारखे कलाकार देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. ‘लॉ’ डिजिटल प्लेटफार्मवर प्रदर्शित होणारी सैंडलवुड इंडस्ट्री अर्थात कन्नड चित्रपटसृष्टीतील पहिलाच चित्रपट आहे. पुनीत राजकुमार यांच्या पीआरके प्रोडक्शन्सद्वारे निर्मित, हा चित्रपट १७ जुलै २०२० ला जगभरात दोनशेहून अधिक देश आणि प्रदेशात अमेझॉन प्राईम व्हिडिओवर विशेष रूपाने प्रदर्शित करण्यात येत आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker